मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सादर केलेल्या 39 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये बारामतीवर जोर आणि मुंबई कमजोर अशी टीका भाजपा नेते माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. विधानसभेत नगर विकास, वने आणि महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईकर असल्यामुळे मुंबईकरांसाठी एखादी पुरवणी मागणी जास्तीची करण्यात येईल अशी आशा आम्हाला होती असा टोला दिला. बारामतीला देण्यास आमचा विरोध नाही मात्र मुंबईला थोडे झुकते माप मिळेल अशी आमची अपेक्षा होती.

तसेच मुंबईसाठी नवे गारगाई धरण उभारण्यात येणार असून या धरणासाठी 4 लाख झाडे तोडावी लागणार आहेत. 400 झाडे तोडली जातात म्हणून मेट्रो कारशेडचे काम आपण थांबविले मग आता गारगाई धरणामुळे तोडण्यात येणाऱ्या झाडांचे आपण काय करणार याचे उत्तर सरकरने द्यावे आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा प्रश्न कसा सोडविणार याबाबतचे खुलासा सरकारने करावा अशी मागणी त्यांनी शेलार यांनी सरकारकडे केली. कार्टर रोड येथील कांदळवन, कोस्टल रोड मुळे तोडणार अशी भीती स्थानिकांमध्ये असून त्या कांदळवनाचे नेमके काय करणार याची ही स्पष्टता सरकारने देणे अपेक्षित आहे.

Gargai Dam | वृक्षतोडीवरून सेना-भाजप पुन्हा आमनेसामने; गारगाई धरणासाठी 4 लाख झाडं तोडणार?


मेट्रो 1 चे ऑडीट सरकारने अद्याप केलेले नाही. रिलायन्सला या मेट्रोतून किती फायदा झाला याचे ऑडीट करणार आहात का ? असा सवाल शेलार यांनी केला. शेलार म्हणाले, 3 (अ) ही मेट्रो भुयारी करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबत सरकारचे धोरण काय ? तर मुंबई शहर आणि उपनगरला जोडणाऱ्या माहीम कॉजवेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले, हा पूल 100 वर्षे जुना असून त्याची वेळीच डागडुजी करण्यात आली नाही तर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे शहर आणि उपनगराचा संपर्क तुटू शकतो अशा महत्वाच्या ब्रिजच्या दुरुस्तीसाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्राथमिकता या कामाला देऊन तातडीने स्ट्रकचरल ऑडीट करण्यात येईल असे सांगितले.

संबंधित बातम्या :

मेट्रो-3 चं कारशेड आरेऐवजी रॉयल पाममध्ये उभारणार?

मेट्रो-3 कारशेडसाठी रॉयल पामची जागा चर्चेत, काय आहे रॉयल पामचा इतिहास?