एक्स्प्लोर

Dombivli : सिलेंडरमधून गॅस चोरणारे दोघे अटकेत, लोखंडी पिन आणि पाईपच्या सहाय्याने करायचे गॅस चोरी 

डोंबिवली मानपाडा पोलिसांनी सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या सिलेंडरचे दुप्पट किमतीत विक्री करत त्याचा काळाबाजार केला जात होता.

डोंबिवली: सिलेंडरमधून गॅस चोरुन तो गरजू लोकांना दुप्पट किंमतीत विकणाऱ्या दोघांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे लोखंडी पिन आणि पाईपच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडरमधून काही प्रमाणात गॅस चोरी करत रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये रीफिल करायचे आणि गरजू लोकांना दुप्पट किमतीत विक्री करायचे. बाळप्पा उनगप्पा ईरगदिन आणि महेश गुप्ता असे अटक आरोपीचे नाव आहे.

गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलेंडरने हजारी ओलांडली तर कमर्शियल गॅस सिलेंडर देखील दोन हजारांच्या घरात पोहचलाय. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारामुळे कमी वजनाचे गॅस नागरिकांच्या माथी मारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघड झाला आहे. बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची रीफिलिंग करणाऱ्या दोन आरोपींच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. डोंबिवली जवळ असलेल्या हेदुटणे गावात धोकादायक पद्धतीने हा काळाबाजार चोरी छुपे सुरु होता. 

डोंबिवली जवळील हेदुटने शिरढोन रोडवर एका वीटभट्टीच्या मागे गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी होत असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेत छापा टाकला. 

या ठिकाणी प्राप्त झालेली माहिती आणि फोटोच्या माध्यमातून तपास करीत टेम्पो चालक विनोदकुमार रामशब्द यादव याला सोनारपाडा येथून ताब्यात घेतलं. त्याने महेश गुप्ता याला भारत गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी टेम्पो दिला होता. तो गॅसचा काळाबाजार करत असल्याचं माहीत झाल्याने त्याने महेश कडून टेम्पो परत घेतला होता. यादव याच्याकडून महेशची माहिती घेत पोलिसांनी डोंबिवलीतून महेश आणि बाळप्पा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 घरगुती  सिलेंडर आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. तर या काळ्या बाजार आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget