एक्स्प्लोर

Crime Nres : बंद घर हेरून टाकायच्या डल्ला, तीन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या   

Crime Nres : डोंबिवली येथे एका घरात चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Crime Nres : रिकामी घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरफोडी करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मिणा इंगळे आणि सुजाता सकट अशी तिन्ही बहिणींची नावे आहेत. 

डोंबिवली येथे एका घरात चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  त्यांच्याकडून 23 तोळे सोन्याचे दागिने  जप्त करण्यात आले आहेत. या तिघींनी आधी किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत .

असा लावला छडा!
डोंबिवली पूर्व राम नगर परिसरात मधील बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील 23 तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरी करणाऱ्या तीन महिला कैद झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.  

कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना या महिला स्टेशनहून  ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही तपासले असता  घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. या तिन्ही महिला मानखुर्द आणि कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस नाईक विनोद चनने, पोलीस कर्मचारी अनुप कामत यांच्या पथकाने तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना  अटक केली आहे. 

पोलिसांनी महिलांकडून चोरीचे 23  तोळे सोन्याचे  दागिने जप्त केले आहेत. या तिघी कधी पासून चोऱ्या करत आहेत आणि अजून किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या आधी  त्यांच्या विरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget