डोंबिवली : दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत एका इसमाला तब्बल साडेचार लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेला भामटा वर्षभराने गजाआड झाला आहे. डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल पेदुरी असं या आरोपीचं नाव आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करत दुप्पट नफ्याचं आमिष दाखवत तो लोकांना गंडा घालत होता.


आरोपी अनिल पेदुरी अस या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच हा भामटा गुजरातला पळून गेला होता. वारंवार मोबाईल नंबर आणि ठिकाणं बदलत वर्षभर पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करत या भामट्याला गुजरातमधील सूरत इथे सापळा रचून अटक केली. त्याने अजून किती जणांची फसवणूक केली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत


डोंबिवली इथे राहणाऱ्या तक्रारदाराची अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून ओळख वाढवली. एका कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यास सांगत या भामट्याने त्यांना दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवलं होतं. या आमिषाला बळी पडत संबंधित फिर्यादीने त्याला सांगण्यात आलेला बँक खात्यावर साडेचार लाख रुपये जमा केले. गुंतवणूक केल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटला मात्र पैसे परत न मिळाल्याने तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी अनिल पेदुरी पसार झाला होता.


आरोपी अनिल पेदुरी गेल्या वर्षभरापासून आपले मोबाईल नंबर आणि राहण्याचं ठिकाण बदलत तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र विष्णुनगर पोलिसांचं एक पथक त्याच्या मागावर होतं. अखेर तांत्रिक पद्धतीने तपासादरम्यान त्यांना अनिलचा ठावठिकाणी सापडला. तो गुजरातमधील सूरत इथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचं पथक सूरत इथे दाखल झालं. तिथे सापळा रचत अनिल पेदुरीला बेड्या ठोकल्या. अनिलने आणखी किती जणांचे अशाप्रकारे फसवणूक केली आहे, याचा तपास सध्या सुरु आहे.


इतर बातम्या