डोंबिवली: पतपेढीत काम करणाऱ्या एका महिला क्लर्कने पेतपेढीतील तेरा लाखांचे सोने चोरल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतपेढीने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पतपेढीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर पतपतपेढीमध्ये काम करणाऱ्या महिलेने क्लर्कने ही चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी महिलेने चोरलेले तेरा लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी पुढील तपास टिळक नगर पोलीस ठाणे करत आहे.


डोंबिवली पूर्वेकडील गोपाळ नगर परिसरात आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमधून सुमारे 13 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते.दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच पतपेढीकडून या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 


पोलीस तपासाच्या दरम्यान ही चोरी पतपेढीमध्येच काम करत असलेल्या एका महिला क्लर्कने केली असल्याचं उघड झालं. पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली असता तिने सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान हे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. या महिलेने पतपेढीमध्ये कुणी नसल्याची संधी साधली. तिने आधी लॉकरची चावी चोरली, त्यानंतर तिने या चावीच्या आधारे लॉकर उघडून दागिने चोरले. 


चोरी केल्यानंतर या महिलेने चोरीतील  सोन्याचे काही दागिने एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी या प्रकरणी या महिलेला ताब्यात घेतलं असून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


पतपेढीत काम करणाऱ्या महिला क्लर्कनेच ही चोरी केल्याने कुपनानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीची चर्चा डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: