एक्स्प्लोर

 करणी काढून देते म्हणत मोलकरणीनेच मालकाला लाखो रुपयांना गंडवलं, आरोपी महिला गजाआड 

Dombivli : तुमच्यावर करणी झाली आहे. या करणीमुळे तुमच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे, अशी बतावणी करुन एका घरकाम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या वयोवृद्ध मालकाला लाखो रुपयांचा गंडा घातला होता.

Dombivli : तुमच्यावर करणी झाली आहे. या करणीमुळे तुमच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. पूजा करुन तुमच्यावर केलेली करणी काढते, अशी बतावणी करुन एका घरकाम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या वयोवृद्ध मालकाला लाखो रुपयांचा गंडा घातला होता. डोंबिवली येथील खोणीगाव परिसरात राहणारे वसंत समर्थ यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी मोलकरीण त्रिशा केळूसकर हिला अटक करुन तिच्याकडून 16 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तिच्या साथीदार महिलेचा शोध पोलिस घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये, संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केलं

डोंबिवली पलावा हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वसंत समर्थ हे एकटेच राहतात, त्यांचा मुलगा हा परदेशात स्थायिक झालेला आहे. वसंत समर्थ हे एकटेच राहत असल्याने त्यांच्या घरात त्रिशा केळुस्कर ही महिला घरकाम करते. अनेक महिन्यांपासून असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्रिशा हीने वसंत यांना तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे. मी एका महिलेला ओळखते, तिच्याकडे वेगळी शक्ती आहे , तुमची पिडा दूर करेल असे सांगितले. वसंत यांना देखील ही बाब खरी वाटली. यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी पैसे लागतील असे सांगत  त्रिशाने पैशांची मागणी केली. तसेच मरियम नावाच्या महिलेची वसंत समर्थ यांची भेट घालून दिली. त्यानंतर या दोघींनी मिळून समर्थ यांच्या घरात पूजेचा दानधर्म जेवणाचा घाट घातला. 

या माध्यमातून त्यांनी वसंत समर्थ यांच्याकडून 15 लाख 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ,रोख रक्कम तसेच वस्तू स्वरूपात घड्याळ, म्युझिक सिस्टम, कपडे सेलेरो कंपनीची कार अशा वस्तू घेतल्या. काही दिवसांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे वसंत यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी वसंत समर्थ यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मानपाडा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या पथकाने तत्काळ त्रिशाचा शोध घेऊन तिला अटक केली. त्रिशाची साथीदार मरियम फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तसेच या महिलांनी लुबाडलेला सर्व मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला. याआधी या महिलांनी अशाप्रकारे कुणाला लुबाडले  आहे का? याचा शोध देखील मानपाडा पोलीस घेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget