एक्स्प्लोर

संतापजनक! बाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापानेच केला दोन्ही मुलींवर अत्याचार, डोंबिवली हादरलं

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. बापानेच आपल्या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dombivli Crime News : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. बापानेच आपल्या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही मुलींवर अत्याचार केला असल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

डोंबिवलीत मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाप हा 43 वर्षे वयाचा असून तक्रारदार पिडीता ही 19 वर्षाची आहे. नराधम बाप गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असून तीच्या लहान बहिणीसोबत देखील त्याने शारीरीक संबंध केल्याचे पिडीतीने तक्रारीत म्हंटले आहे. पिडीतेने मानपाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल करताच नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये 9 वर्षाच्या मुलीच्या लैगिंक छळवणूक प्रकरणी कराटे कोचला अटक

कल्याणमध्ये 9 वर्षाच्या मुलीची लैगिंक छळ केल्याच्या प्रकरणी कराटे कोच गिरीष वाघमारे याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कराटे कोच वाघमारे हा घरी एकटा होता. त्याने पिडीत 9 वर्षाच्या मुलीला चेस्ट गार्ड दाखवण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. तिच्या मागून चेस्ट गार्ड लावून तिची लैगिंक छळवणूक केली. हा प्रकार पिडित मुलीने घरी गेल्यावर तिच्या पालकांना सांगितला. पीडित मुलीच्या आईने महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीसोबत कराटे कोचने लैगिंक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत कराटे कोच वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकून कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना

 
जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपीचं घर सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडालीय, एका अल्पवयीन तरुणीचे अश्लील फोटो काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकणारा आरोपी शेख इम्रान शेख हबीब याला बुधवारी अटक केले होते. रात्री या आरोपीच्या घराला आग लागल्याचे समोर आलं आहे. दरम्यान ही आग कोणी लावली का लागली याचा पोलिस शोध घेत आहे. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात आकस्मिक आग लागल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget