एक्स्प्लोर

Dombivli Crime : बेडरूममध्ये सोबत पत्नी झोपली नसल्याचा राग, लग्नाच्या वाढदिवशीच पतीने केला पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला

Dombivli Crime : गेल्या दोन वर्षांपासून पत्नी ही पतीला सोडून तिच्या माहेरी राहत होती. पण लग्नाचा वाढदिवस असल्याने ती डोंबिवलीत तिच्या पतीच्या घरी आली होती. 

ठाणे, डोंबिवली : बेडरूममध्ये सोबत पत्नी झोपली नसल्याच्या रागातून लग्नाच्या वाढदिवशीच पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना डोंबिवली पूर्वमधील म्हात्रेनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यानंतर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील  हल्लेखोर पती सुरेश पैलकर याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लखोर पती डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत 28 वर्षीय मुलासह राहतो. गेल्या दोन वर्षांपासून पत्नी आणि हल्लेखोर पतीमध्ये घरगुती वाद असल्याने त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे पत्नी सुलोचना ही आपल्या माहेरी कर्नाटक येथे राहत आहे. त्यातच 30 ऑगस्ट रोजी या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने पत्नी माहेरहून डोंबिवलीतील सासरच्या घरी आली होती. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर पती हा आपल्या बेडरूममध्ये रात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी गेला होता. त्यावेळी पत्नी मात्र बेडरूममध्ये न जाता ती दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली.

पतीने पत्नीला आपल्या बेडरूममध्ये सोबत झोपण्यासाठी सांगितले. मात्र पत्नीने नकार देताच, दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून हल्लेखोर पतीने घरातील धारदार सुरीने पत्नीवर वार केले. हे पाहून मुलगा भांडण सोडविण्यासाठी  मध्यस्थी  करण्यासाठी आला असता, हल्लेखोराने त्यालाही मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्याच्या आईला जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान, या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मुलगा सुरज (वय 26) याच्या तक्रारीवरून डोंबविली पोलीस ठाण्यात हल्लेखोर पतीवर  विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करीत आहेत.

उसनवारीच्या वादातून नातेवाईक महिलेवर हत्या

दुसरीकडे डोंबिवलीतच काही दिवसांपूर्वी उसनवारीच्या वादातून नातेवाईक महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली.  पैशांच्या उसनवारीच्या वादातून एकाने नातेवाईक महिलेच्या डोक्यात हातोडी मारून आणि मानेवर इंजेक्शन टोचून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. राजीव भुयान असं गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचं नाव आहे, तर ममताराणी सुभाष पात्रा असं जखमी महिलेचं नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Pradeep Purnekar and Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget