एक्स्प्लोर

कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संदीपने आपण काम करत असलेल्या टेक्सटाईल पार्क कंपनीत आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले आहे.

धुळे: जिल्ह्यातील (Dhule) शिरपूर जवळील गिधाडे तापी नदी (River) पुलावरून उडी घेऊन एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने तापी पुलावरून एक भावनिक व गंभीर आरोप करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. संदीप उदेसिंग गिरासे (28), रा. अहिल्यापूर, शिरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने नदीत उडी घेतली होती. आज सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शिरपूर शहर पोलीस (Police) ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संदीपने आपण काम करत असलेल्या टेक्सटाईल पार्क कंपनीत आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले आहे. कंपनीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन मुलींनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणानंतर कंपनीच्या मालकांनी आणि प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकले होते. कंपनीत परप्रांतीय लोकांना वाचवले जाऊ शकते, मात्र महाराष्ट्राच्या स्थानिक तरुणाला न्याय दिला जात नाही, अशी उद्विग्न भावनाही संदीपने व्हिडिओत मांडली होती. 

तापी पुलावर संदीपचा मोबाईल, मोटरसायकल आणि चप्पल पोलिसांना आढळून आली होती. दोन दिवस स्थानिक प्रशासन आणि पट्टीचे पोहणारे नदीपात्रात त्याचा शोध घेत होते अखेर आज त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संदीपच्या मृत्यूची बातमी समजताच अहिल्यापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. जोपर्यंत आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या संशयितांना तात्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी लावून धरली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा

पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget