एक्स्प्लोर

Dhule Crime : धुळ्यात भयंकर घटना! साक्रीत पतीने पत्नी अन् तीन वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून मारले; स्वतःवरही केला जीवघेणा हल्ला

Dhule Sakri Case : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे येथे धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला दगडाने ठेचून निर्घृणपणे संपवलं आहे.

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे येथे एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या 24 वर्षांच्या पत्नीला आणि अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला दगडाने डोक्यात मारून निर्घृणपणे संपवलं. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागेश ठाकरे (वय 33) असे या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी पतीचे नाव असून, त्याची पत्नी बाईचीबाई ठाकरे (वय 28) आणि मुलगा रोहित ठाकरे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.

Sakri Case : खरेदीवरून परतताना पेटला वाद

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाकरे कुटुंब ऊसतोडीच्या कामासाठी बाहेर पडणार होते. ऊसतोडीला जाण्यापूर्वी साक्री येथील आठवडे बाजारातून खरेदी करून हे कुटुंब घरी परतत होते. त्यावेळी वाटेतच पती नागेश आणि पत्नी बाईचीबाई यांच्यात अचानक जोरदार वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात नागेशने रस्त्यावरील मोठा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यात घातला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Crime News Marathi : 3 वर्षांच्या चिमुकल्यालाही सोडले नाही

पत्नीची हत्या केल्यानंतर नराधम नागेशचा राग शांत झाला नाही. त्याने आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या निष्पाप मुलावरही दगडाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्या रोहितचाही जागीच करुण अंत झाला. घटनेच्या वेळी वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या काही स्थानिक नागरिकांवरही आरोपीने दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Dhule Crime Investigation : आरोपी पती धुळ्यात उपचारासाठी दाखल

पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी नागेश ठाकरे याने स्वतःच्या डोक्यातही दगडाने घाव घालून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आरोपी नागेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून कौटुंबिक वादाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Vishwajeet Kadam and Satej Patil: स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Embed widget