एक्स्प्लोर

Dhule Crime : धुळ्यात धक्कादायक प्रकार! शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; तिघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Dhule Crime News Updates : पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तीन नराधमांनी तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. 

धुळे : प्रेमाचं आणि लग्नाचं आमिष दाखवून एका 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तीन नराधम तरुणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नकाणे गावात राहणाऱ्या आणि 10 वीत शिकत असलेल्या एका मुलीला गावातीलच तीन तरुणांनी संगनमत करून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. या तिघांनीही तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. गेल्या 11 महिन्यांपासून हा छळ आणि घृणास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Dhule Cafe Crime : देवपूर परिसरातील कॅफेमध्ये अत्याचार

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका आरोपीने आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली होती. मात्र, काही दिवसांनी त्याचे वर्तन, चुकीच्या सवयी आणि व्यसनाधीनता लक्षात आल्यावर पीडितेने त्याच्यापासून स्वतःला दूर केलं. 

या गोष्टीचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर, याच तरुणाच्या दुसऱ्या एका मित्राने मध्यस्थीचा आव आणला. त्याने मुलीला समजावण्याच्या बहाण्याने पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिला तिसऱ्या एका तरुणाच्या जाळ्यात ढकलले. पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या नराधमांनी तिला देवपूर भागातील एका खासगी कॅफेमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

Dhule Assault Case : पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू

पीडित मुलीच्या सोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार जेव्हा तिच्या कुटुंबीयांना समजला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून तातडीने पावले उचलली आणि तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध पॉस्को (POCSO) कायद्यासह विविध कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget