एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं

Deepak Kesarkar On Ashok Kharat : आपण शिर्डीच्या साईबाबांचे भक्त आहोत, त्यामुळे कोणत्याही अघोरी पूजा किंवा विधीवर आपला विश्वास नाही असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. 

मुंबई : अशोक खरात (Ashok Kharat) अघोरी पूजा करतोय हे माहिती असतं तर मी त्याच्याकडे कधीच गेलो नसतो, मी साईभक्त आहे. या प्रकरणात संजय राऊतांच्या कंपूकडून आपल्याला बदनाम केलं जात असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि शिंदेंचे आमदार दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) दिली. अशोक खरातच्या कोणत्याही कृत्यात आपला सहभाग नाही, कोणत्याही महिलेची त्याच्याशी ओळख करून दिली नाही, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं. 

या प्रकरणाशी आपला संबंध जोडला जात आहे तो राजकीय द्वेषाने. ज्यावेळी शिवसेनेमध्ये संघर्ष पेटला होता, त्यावेळी आपण एकनाथ शिंदेंची बाजू महाराष्ट्रासमोर आणली. त्यामुळे ठाकरे गटाचा आपल्यावर राग आहे. त्या रागापोटी बदनाम केलं जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केला. मी साईबाबांचा भक्त आहे, त्यामुळे कुठलीही अघोरी पूजा किंवा कृत्य करत नाही असं केसरकरांनी म्हटलं.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खरातसोबत माजी मंत्री दीपक केसरकरांचा फोटो समोर आला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने केसरकरांवर आरोप करण्यात आले. दीपक केसरकर हे अशोक खरातचे पार्टनर होते असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या सगळ्या आरोपांवर आता दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Deepak Kesarkar On Ashok Kharat : खरातच्या कृत्याची माहिती नव्हती

दीपक केसरकर म्हणाले की, "अशोक खरातला अटक होईपर्यंत मला त्याच्या कृत्याची माहिती नव्हती. एखाद्याचा फोटो सोबत असणं म्हणजे त्याच्या वाईट कृत्यात सहभागी असणं असं नाही. मी अशोक खरातच्या कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी नाही. अशोक खरातला वाचवण्यासाठी मी कुठल्याही पोलीस स्टेशनला फोन केला नाही. कुठल्याही महिलेची मी त्यांच्याशी ओळख करून दिली नाही. महिलांबाबत त्याने केलेल्या कोणत्याही कृत्याबाबत मला माहिती नाही."

Deepak Kesarkar On Sanjay Raut : संजय राऊतांवर आरोप

अशोक खरात प्रकरणात आपल्यावर चुकीचे आरोप केले जात असून आपल्या मतदारसंघात महिलांना पैसे देऊन विरोधात मोर्चे काढण्यात आले, असा आरोप केसरकरांनी केला. सार्वजनिक जीवनात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला. संजय राऊत आणि त्यांच्या कंपूने जे काही राजकीय षडयंत्र रचलं आहे ते कधीही यशस्वी होणार नाही. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे. त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरवू, असं ते म्हणाले. 

शिंदेंसोबत शिवमंदिरात गेलो होतो

ईशानेश्वर मंदिर हे शिर्डीपासून 10 किमीवर आहे. त्यामुळे एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या ठिकाणी गेलो असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं. ते म्हणाले की, "श्रद्धा हा वेगळा भाग आहे आणि जादूटोणा हा वेगळा भाग आहे. मी कुठल्याही प्रकारच्या अघोरी विधीमध्ये भाग घेतला नाही. अशोक खरातने त्याच्या ज्योतिषाच्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवलं. त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget