Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात हुपरीमधील निर्जन माळातील कालव्यामध्ये जळालेल्या कारमध्ये सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कालव्यात कार पडल्याची माहिती निनावी सुत्राद्वारे पोलिसांना मिळाली. या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कालव्यातील कार बाहेर काढली असता त्यामध्ये सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे.


जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ


हुपरीमधील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यातील पाण्यात मारुती अल्टो कार जळालेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कालव्यातून बाहेर काढण्यात आली. कार बाहेर काढल्यानंतर कारमध्ये मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. दुसरीकडे, या भागातील एक तरुण गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 


वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत


दरम्यान, आजरा तालुक्यात चिमणेत शेतातील आग विझवताना पाय घसरून पडल्याने वारकरी वृद्धाचा होरपळून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली होती. विठोबा भिमराव नादवडेकर (वय 83) असं वृद्धाचं नाव आहे. शेतामध्ये पाला एकत्र करून जाळण्यासाठी विठोबा नादवडेकर शेतात बुधवारी (8 मार्च) गेले होते. पाला गोळा करून झाल्यानंतर त्यांनी तो पेटवून दिला. मात्र, रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे पाला पेटवल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. 


भेदरलरेल्या नादवडेकर आग इतरत्र पसरेल म्हणून आग विझवण्यासाठी धडपड करू लागले. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग असल्याने त्यांची आग विझवताना ते पाय घसरून पडले. पडल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. 


चिमणे-झुलपेवाडी रोडवर असलेल्या झरा नावाच्या शेतामध्ये दिव्यांग नादवडेकर पाला गोळा करण्यासाठी गेले होते. पाला गोळा करून झाल्यानंतर त्यांनी तो पेटवून दिला. मात्र, रणरणत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे पाला पेटवल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे भेदरलरेल्या नादवडेकर आग इतरत्र पसरेल म्हणून आग विझवण्यासाठी धडपड करू लागले. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग असल्याने त्यांची आग विझवताना ते पाय घसरून पडले. पडल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आग दिसून आली. बाजूलाच धोंडीबा नादवडेकर याचा मृतदेह आगीत होरपळल्या अवस्थेत होता. 


गडहिंग्लज तालुक्यातही अशीच घटना 


दरम्यान, असाच भयंकर प्रकार गडहिंग्लज तालुक्यात घडला होता. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रामजी गणू जाधव (वय 80) या वृद्धाचा काजू बागेतील पालापाचोळा पेटवत असताना आगीत मृत्यू झाल्याची घटना झाली होती. ‘माळाचे शेत’ नावाच्या शेतात काजूच्या बागेत गेले होते. काजू बागेतील साफ-सफाई करुन पालापाचोळा पेटवत असताना बागेमध्ये आग विझवताना ते आगीमध्ये अडकले. या आगीमध्येच त्यांचा गुदमरुन आणि होरपळू मृत्यू झाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या