Crime News : छत्तीसगडमधील बस्तर परिसरात पत्रकार मुकेश चंद्राकर (mukesh chandrakar) यांची करण्यात आली आहे... गेले दोन दिवस मुकेश चंद्राकर (mukesh chandrakar) बेपत्ता होते... पोलीस त्यांचा शोध घेत होते.. मात्र आज संध्याकाळी बिजापूर जिल्ह्यातील चट्टानपारा परिसरात एका रहिवाशी भागातील पाण्याच्या टाकीतून त्यांचा मृतदेह सापडला आहे.. मृतदेहावर मारहाणीचे खुणा असून अपहरण केल्यानंतर मुकेश चंद्राकर (mukesh chandrakar) यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे...पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे....
मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री विष्णू देव साई
विष्णू देव साई म्हणाले, विजापूर येथील तरुण आणि पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता जगताची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी मृत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
पोलिसांकडून 12 हून अधिक जणांची चौकशी
पत्रकार मुकेश चंद्राकर 1 जानेवारीपासून बेपत्ता होते, दरम्यान, आता त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्राकर यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. एनडीटीव्हीसाठी काम करणारे स्वतंत्र पत्रकार मुकेश चंद्राकर हे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या वृत्तांसाठी प्रसिद्ध होते. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनजवळ असलेल्या एका बंदिस्थपणे बांधलेल्या सेप्टिक टाकीत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलीस या प्रकरणातील बाराहून अधिक संशयितांची चौकशी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला