एक्स्प्लोर

मोठी बातमी: घरावर पेट्रोल फवारून पेटवलं, झोपेत असलेल्या आई मुलीचा अंत

Crime News: घरातील लोकांना बाहेर येता येऊ नये म्हणून अज्ञातांनी घराला बाहेरून कडी घातली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.

Crime News: घरावर पेट्रोल फवारून पेटवल्याने झोपेत असलेल्या आई आणि मुलीचा आगीत जळून अंत झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात बेळगली येथे मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. 

या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोलनी पेटवले घर

कर्नाटकातील बेळगली येथील अक्कीमरडी येथे शेतात एका पत्राच्या शेडमध्ये दस्तगीर साब मौलासाब पेंढारी कुटुंब राहते. या कुटुंबाच्या घरास मध्यरात्री अज्ञातांनी विद्युत मोटारीच्या सहाय्याने पेट्रोल शिंपडत आग लावली.

या आगीत झोपेत असलेल्या मायलेकींचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञातांनी घर का पेटवले, याविषयी अद्याप कोणतेही माहिती समोर आली नसून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ‍श्वानपथकालाही पाचारण केले होते.

कुटुंबातील लोक बाहेर येऊ नये म्हणून घराला बाहेरून कडी

अज्ञातांनी घराला आग लावून कुटुंबातील लोक बाहेर येऊ नये यासाठी बाहेरून कडी लावली होती.  पेट्रोलचा वास आल्यावर सुभान पेंढारी यांना जाग आली. त्यांनी आजोबा दस्तगीर यांनाही उठवले परंतु दरवाजाला बाहेरून कडे असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. अखेर दरवाजाची फळी तोडून ते दोघे बाहेर पडले. मात्र, झोपेत असलेल्या आईला उठवण्यासाठी मुलगी शबाना गेली , पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आई मुलीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

जखमींवर उपचार सुरु, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ५ पथके रवाना

आगीत भाजलेले सुभान पेंढार यांनी दस्तगीर पेंढारे यांच्यावर महालिंगपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यानंतर उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास यांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. घटनास्थळी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला देखील पाचरण करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पाच पथके स्थापन करून विविध ठिकाणी रवाना केली आहेत.

हेही वाचा:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!
स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!
Nashik Crime News: फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहनांची तोडफोड, पंचवटीत टोळीयुद्धातून थरार
फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहनांची तोडफोड, पंचवटीत टोळीयुद्धातून थरार
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
SSC Exam Paper 2026: खळबळजनक! उद्या पेपर आणि आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी; सांगोल्यात परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली
खळबळजनक! उद्या पेपर आणि आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी; सांगोल्यात परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली

व्हिडीओ

Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
Embed widget