Kalyan Crime News: कल्याणजवळ (Kalyan News) असलेल्या आंबिवली स्थानकात (Ambivali Station) एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं खळबळ पसरली आहे. आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशानं ब्लेडनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात टीसी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचं नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासात होते. यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितलं. त्यावेळी प्रवाशांनी खिशातलं ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करत प्राण घातक हल्ला केला. 


घडलं नेमकं काय? 


कल्याणजवळ असलेल्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशानं ब्लेडनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील कुमार गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचं नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर ते तिकीट तपासत होते. यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितलं. या प्रवाशानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, याच दरम्यान टीसीनं या प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी प्रवाशाने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानं या हल्ल्यात सुनील गुप्ता यांचा जीव बचावला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.


दरम्यान, मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन. सकाळच्या वेळी कार्यालय गाठण्यासाठी, तर प्रवासासाठी मुंबईकर हमखास मुंबई लोकलचाच पर्याय निवडतात. पण अनेकदार काही लोक विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळून येतं. याच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी टीसी तिकीट तपासतात. तसेच, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंड आकारतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amravati Crime: अमरावती हादरलं, एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात जणांना अटक