Chhattisgarh Naxal गडचिरोली : सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या  नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चौहान यांनी प्रथमच या बाबत मोठा खुलासा केला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानांतर्गत माओवादी चक्क बनावट नोटा बनवत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये बनावट नोटा बनवण्याचे साहित्य प्रथमच जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून हे मोठं यश पोलिसांना मिळाले आहे. परिणामी आता माओवादी संघटना आर्थिक संकटात संपडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


2022 पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण


छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या माओवादी विरोधी कारवाई मध्ये पोलिसांना  बनावट नोटा बनवण्याचे साहित्य आढळून आले आहे. यात 50, 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने आढळून आले आहे. पश्चिम बस्तर भागात 2022 पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. प्रत्येक एरिया कमेटीच्या एक किंवा दोन सदस्यांना या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आल्याचीही माहिती पुढे आले आहे.


गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई


छत्तीसगडच्या सुकमाच्या जंगलात बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची माहिती छत्तीसगड  पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान जवानांच्या संयुक्त दलाला या कारवाईत मोठे यश मिळाले आहे. माओवादी बस्तरमधील निरपराध बोळी आदिवासी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना अडकवायचे प्रयत्नात आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेली माओवादी संघटना आता बनावट नोटांना पर्याय बनवण्याच्या तयारीत आहे. एकीकडे संपूर्ण दंडकारण्य भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याने मागिलं काही महिन्यात गडचिरोलीसह छत्तीसगढच्या बस्तर भागात अनेक चकमकीत 120 हुन अधिक माओवाद्यांचा खात्मा करण्यात आले आहे. परिणामी, पोलिसांनी आणखी एक माओवाद्यांचा डाव उधळला आहे. 


 25 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली मोर्‍हक्या गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण


गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या (Gadchiroli Naxal Leader Surrender) समजल्या जाणार्‍या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा आणि माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या