एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar : दोन वर्षांपूर्वी नापास झाल्याचा राग, अर्धा तास वाद अन् त्यानंतर रक्तरंजित शेवट; शाळकरी विद्यार्थ्याकडून शिक्षकावर सपासप वार

Chhatrapati Sambhajinagar Crime : शाळा सोडल्याचा दाखला घ्यायला आलेल्या विद्यार्थ्याने जुन्या रागातून शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला असून त्यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. 

Chhatrapati Sambhajinagar School Attack : शाळा... जिथे विद्यार्थी घडतात, संस्कार रुजतात आणि शिक्षक आयुष्य घडवतात. पण छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत घडलेली घटना या विश्वासालाच हादरा देणारी ठरली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने हल्ला केला. दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा राग, अर्धा तास चाललेला वाद आणि त्यानंतर रक्तरंजित शेवट. नेमकं काय घडलं?

Vishal Dhushing Attacked : मुख्याध्यापिकांच्या दालनात अर्धा तास वाद

टीसी घेण्यासाठी आलेला एक अल्पवयीन विद्यार्थी थेट मुख्याध्यापिकांच्या दालनात पोहोचला. तिथे त्याची भेट झाली त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्याशी. सुरुवातीला चर्चा सुरू झाली, मात्र काही क्षणांतच त्याचं रूपांतर वादात झालं. मुख्याध्यापिका आणि शिक्षक विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. विद्यार्थ्याच्या मनात दोन वर्षांपासून साचलेला राग आज उफाळून आला होता.

Online Knife Ordered : दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा सूड, ऑनलाइन मागवला चाकू

2023 मध्ये नववीत शिकत असताना विशाल धूशिंग हे त्या विद्यार्थ्याचे वर्गशिक्षक होते. त्याच वर्षी तो परीक्षेत नापास झाला. त्या काळात शिक्षकांसोबत त्याचे वादही झाले होते. याच रागातून आज तो टीसी घेण्यासाठी येताना ऑनलाइन मागवलेला चाकू सोबत घेऊन आल्याचं तपासात समोर आलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime Case : अचानक वार करत केला रक्तपात

वाद संपताच वर्गशिक्षक दालनाबाहेर पडत असताना विद्यार्थ्याने अचानक चाकू बाहेर काढत त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षकांना वाचवण्यासाठी धावलेल्या एका व्यक्तीलाही त्याने चाकूचा धाक दाखवत मागे हटवलं. या गोंधळात मुख्याध्यापिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.

Student Attacked Teacher : शिक्षक रुग्णालयात, विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मात्र या एका घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात वाढत जाणारा राग वेळेवर ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत का? ऑनलाइन सहज उपलब्ध होणारी घातक हत्यारं अल्पवयीनांच्या हातात कशी पोहोचत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं... शिक्षकच सुरक्षित नसतील, तर शिक्षण व्यवस्थेसमोर उभं राहिलेलं हे संकट किती गंभीर आहे, याचाच विचार आता समाजाला करावा लागणार आहे.

ही बातमी वाचा :

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget