एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग

Chhatrapati Sambhajinagar : पाच वर्षीय गतिमंद मुलाला संपवल्याप्रकरणी सावत्र बाप आणि जन्मदात्या आईला अटक करण्यात आली आहे. नव्या संसारात मुलगा अडसर ठरत असल्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातील हर्सूल-सावंगी बायपास परिसरात शेतात पाच वर्षीय गतिमंद बालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत सावत्र बाप आणि जन्मदात्या आईला अटक केली आहे. ओंकार असं मृत मुलाचं नाव असून, नव्या संसारात तो अडसर ठरत असल्यानं त्याला निर्घृण पद्धतीने संपवण्यात आल्याची कबुली आईने पोलिसांसमोर दिली आहे.

या प्रकरणात गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी संतोष सोनाजी ढाळे (वय 34, रा. मोप, जि. वाशिम) आणि त्याची पत्नी पूजा यांना अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर या अमानुष हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले.

Mother Second Marriage Case : आईच्या दुसऱ्या लग्नानंतर बदललं आयुष्य

पूजा हिचे पहिले लग्न संदीप पाडेवाड याच्यासोबत झाले होते. त्यांना शुभांगी (10) आणि ओंकार (5) अशी दोन मुले होती. पती संदीप याला दारूचे व्यसन असल्यानं पाच वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. त्यानंतर पूजाने मुलगी सासूकडे ठेवली, तर गतिमंद मुलगा ओंकारला सोबत घेऊन ती मजुरीसाठी जालना येथे आली होती.

Shiradi Temple Marriage : शिर्डीत प्रेमविवाह, महिनाभरापूर्वी संभाजीनगरात वास्तव्य

सुमारे चार महिन्यांपूर्वी पूजाची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी शिर्डी येथील मंदिरात जाऊन लग्न केले. मागील महिन्याभरापासून ते चिकलठाणा येथील सावित्रीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

Disabled Child Murder : गतिमंद मुलगा नव्या संसारात ठरला अडसर

ओंकार गतिमंद असल्याने त्याची देखभाल करणे दोघांनाही जड जात होते. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष दारूच्या नशेत वारंवार ओंकारला मारहाण करत असे. अखेर मुलाला कायमचे दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खुनाचा कट रचला.

Chhatrapati Sambhajinagar Crime Investigation : 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा

हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील शेतात मुलाचा मृतदेह फेकून दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे अवघ्या 24 तासांत आरोपींना अटक केली.

Child Safety Concern : जन्मदात्या आईच्या सहभागामुळे संताप

या घटनेत स्वतःच्या मुलाच्या हत्येसाठी जन्मदात्या आईनेही साथ दिल्याचे समोर आल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका निरागस आणि गतिमंद मुलाचा नव्या संसारासाठी बळी दिल्याने समाजमन हेलावून गेलं आहे.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
आमची मुलगी खाल्ली...गिळली; पायलचं माहेर धाय मोकलून रडलं, 7 वर्षे काय घडलं?, सगळं सांगितलं!
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Embed widget