एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट

Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता.

Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू (Chhatrapati Sambhajinagar Family News) झाला होता. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 21 ऑगस्ट रोजी घडली होती. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. (Chhatrapati Sambhajinagar News)

कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल 21 ऑगस्टला सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. सदर प्रकरणी आता कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain Marathi News)

आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता- कल्याणी परडे (Chhatrapati Sambhajinagar Family Marathi News)

कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती. आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता, असा खळबळजनक दावा कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. माझे दाजी (मुरलीधर चांदवडे) ड्रायव्हर होते हे आम्ही मानतो मात्र ते गरीब नव्हते. चांगल्या घरातून ते आलेले होते. त्यांच्याकडे शेती होती शेतीतून पैसा यायचा. आजकाल आयफोन स्वस्त आहे, सेकंड हॅन्ड घेतला तर वीस पंचवीस हजार रुपयांमध्ये येतो. कुणाला अभ्यासासाठी, क्लासेससाठी आयफोन हवा होता. तो त्यांनी घेऊन दिला. दीदीकडेसुद्धा (संगीता चांदवडे) आयफोन होता, असं कल्याणी परडे यांनी सांगितलं.

संगीता चांदगुडेंनी भावना व्यक्त करण्यासाठी यूट्यूबला एक माध्यम बवनवलं होतं- कल्याणी परडे (Chhatrapati Sambhajinagar Family Marathi News)

एवढी मोठी गोष्ट नाही की, आम्ही त्याला दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला. माझी दीदी म्हणजे संगीता चांदगुडे हे तिच्या सासरच्या मंडळी संदर्भात नाराज होते त्याला काही कारणे होते. दाजी घर सोडून गेले आणि ते वापस येत नव्हते. त्यामुळे ती व्यथीत होती. त्यांचे वाद वाढत चालले होते त्यांच्यामध्ये कुठलाही संवाद नव्हता. त्यामुळे संगीता चांदगुडेंनी भावना व्यक्त करण्यासाठी यूट्यूबला एक माध्यम बवनवलं होतं तिचा तेवढा हक्क आहे. कारण 20 वर्षांपासून ते सोबत होते. ज्या गोष्टी तिला योग्य वाटत नव्हत्या, त्यावर तिने बोलणं वाईट नाही. तिच्या हक्कासाठी जर ती सासरच्या मंडळीला बोलत असेल तर त्यात वाईट काय? कुणासोबत तिचं बोलणं होत नव्हतं. त्यामुळे तिने सोशल मीडियाला माध्यम बनवलं, अशी माहिती कल्याणी परडे यांनी दिली.

कुणालवर दोघांचं खूप प्रेम, पैशांची कमी नव्हती, कुणालची मावशी काय काय म्हणाली? (Chhatrapati Sambhajinagar Family Marathi News)

काही जमिनीचे वाद होते. पण त्या संदर्भात मला जास्त माहित नाही. कारण मी तेव्हा लहान होते. कुणालला मरायचे नव्हतेच, त्याला फक्त त्याच्या वडिलांना पुन्हा घरी आणायचे होते. असे केल्याने माझे वडील भावनिक होतील आणि ते माझ्याकडे येतील असे त्याला वाटत होते. चार-पाच दिवसा अगोदर त्यांच्या फोनवरून बोलणं झालं होतं. तेव्हा कुणालने तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता, मला तुम्ही पाहिजे, असे वडिलांना सांगितले होते. त्याला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या. पण त्याला समजून सांगण्याचे अजून पर्याय होते. मात्र त्यांच्या सुसंवाद नव्हता. त्यामुळे हे सगळं घडलं. त्यामुळे कुणाल जास्त तणावात होता. मी सुद्धा त्याला समजून सांगितले होते की, प्रत्येक परिवारात अशा गोष्टी असतात. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याचे वडील पाहिजे होते. मी असे करणार त्याने अजिबात कुणाला सांगितले नव्हते. आणि तसं वाटलं नव्हतं. पण अचानक मला त्याचा कॉल आला आणि माफ करा मी असं करत असल्याचं कुणालने सांगितलं. तो फक्त एक अपघात झाला कारण त्याला पैशांची कमी नव्हती. त्याचे वडील त्याच्यासोबत राहत नव्हते, तरी कुणालवर दोघांचं खूप प्रेम करत होते. तसेही कुणालला काही झालं असतं तर दाजीने जीव दिला असता, एवढं त्यांचं प्रेम होतं. त्याला त्रासामध्ये दाजी कधी पाहू शकत नव्हते. 2025 मध्ये खवड्या डोंगरावर कुणाल आत्महत्यासाठी नव्हे तर फिरण्यासाठी तिथे गेला होता. तो काही कारणावरून तेव्हा नाराज होता मात्र, त्याने त्याच्या आईला मेसेज करून सांगितले होते की. मी संध्याकाळपर्यंत घरी येईल. मात्र दीदीने त्याचा मेसेज बघितला नाही आणि ती पोलीस ठाण्यात पोहोचली. रात्री अकरा वाजता पोलिसांनी तो मेसेज बघितला. आपण अजूनही चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन विचारू शकता. तेव्हा तो खवड्या आत्महत्या करण्यासाठी गेला नव्हता, तर नाराज असल्यामुळे फिरायला गेला आणि संध्याकाळपर्यंत घरी येणार होता. कदाचित यावेळेस देखील कुणालला आत्महत्या करायची नव्हती. फक्त असे भावनिक करून त्याला आई-वडिलाला एकत्र आणायचे होते, असा दावाही कल्याणी परडे यांनी केला आहे. 

संबंधित बातमी:

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मंगळसूत्र काढून फेकते, वडिलांना सोडते; डोंगरावरुन पडून मृत्यू होण्याआधी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget