Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधू एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रागाच्या भारत लेकानं आपल्याच जन्मदात्या बापाची हत्या केलीय. दरम्यान, हत्याकेल्यानंतर या बाबतची माहिती कुणाला होऊ नये म्हणून भयभीत झालेल्या मुलाने यासाठी वडिलांचा मृतदेह घरातच पुरला. मात्र 10 दिवसांनी परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने या घटनेचे बिंब फुटलं.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांचा मुलासोबत वाद झाला. दरम्यान हा वाद विकोपाला गेल्याने मुलाने वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा खून केला. ही माहिती कुणाला कळू नये यासाठी वडिलांचा मृतदेह घरातच पुरला. मात्र 10 दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने या घटनेचे बिंब फुटलं. ही खळबळीच्या घटना पैठण तालुक्यातील कडेठाण येथे उघडकीस आली आहे. कल्याण बापूराव काळे (वय 58) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राम कल्याण काळे असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.


मर्चंट नेवीतील रिटायर कूकचे टोकाचे पाऊल; तलावात स्वतःला झोकून दिलं


विरार : विरार पूर्वेच्या मनवेल पाडा तलावात मर्चंट नेवीतील रिटायर कूकने आत्महत्या केल्याची दुर्दैवी दुर्घटना घटना घडली आहे. ही घटना काल (22 नोव्हेंबर) सायंकाळी घडली आहे. निराशा पोटी त्यांने आपल्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल करून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनंत आगरे वय 51 वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तलावातून मृतदेह बाहेर काढण्यास तीन ते तार तासाचा कालावधी लागला होता. सध्या या प्रकरणाचा विरार पोलीस आता पुढील तपास करत आहेत.


बसस्थानकातून सहा किलो गांजा जप्त; ओडिसा राज्यातून तस्करी तिघे गजाआड


ओडिसा राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या मोहरक्या सह यवतमाळच्या दोन खरेदीदारांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. तसेच त्यांच्याजवळून 6 किलो गांजा व दोन मोबाईल असा 1 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. बैस्नव हरा प्रधान, प्रशांत गावंडे. हरी ओम ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.


आणखी वाचा