Budhaditya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच अनेक मोठमोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे अनेक शुभ-अशुभ राजयोग निर्माण होणार आहे. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि व्यवसायाचा कारक दाता बुध ग्रहाचा देखील समावेश आहे. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात सूर्य आणि बुध ग्रह यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचं नशीब नवीन वर्षात उजळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मीन रास (Pisces Horoscope)
बुधादित्य राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील. हा योग मीन राशीतच जुळून आल्यामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. जी कामे तुमची थांबली होती त्या कामांना पुन्हा गती मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुधादित्य राजयोग जुळून आल्याने वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो. हा योग तुमच्या कुंडलीतील भाग्याच्या स्थानी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासाठी खुली होतील. समाजात मान-प्रतिष्ठा टिकून राहील.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी बुधादित्य राजयोग लाभदायी ठरेल. या काळात कर्म भावाच्या स्थानी हा योग जुळून येतोय. त्यामुळे तुमच्या कामकाजात चांगली प्रगती दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी देखील करु शकता. तसेच, उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासाठी खुली होतील. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :