एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime: गतिमंद मुलांना हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण, 6 निलंबित, पण अद्याप आरोपींना अटक नाही!

गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कूकरच्या झाकणाने मारहाण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी असे 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कूकरच्या झाकणाने मारहाण (Assault) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी असे मिळून 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी मारहाण करणारे दीपक गोविंद इंगळे आणि प्रदीप वामन देहाडे दोघांना निलंबित करण्यात आले होते. आता एकूण 6 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मारहाण होत असताना तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते. त्यांनी या घटनेची ना संस्थाचालकांकडे, ना समाज कल्याण विभागाकडे वाच्यता केली.

हा प्रकार दाबून ठेवण्यास तेही जबाबदार आहेत. म्हणून मारहाण करणारे आणि तेथे उपस्थित असलेल्या सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. मंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दिव्यांग आयुक्तालयाने (Disabilities Commissioner) पंधरा दिवसांत अहवाल मागवला आहे. दोषींवर आणि संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. असे असले तरी या संतापजनक प्रकारातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या आरोपींना नेमकी कधी अटक होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : 6 निलंबित, पण अद्याप आरोपींना अटक नाही! कोण आहेत आरोपी?

दरम्यान या संतापजनक आणि अमानवी वागणुकीत प्रामुख्याने दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यात दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे यांचा समावेश आहे. दीपक इंगळे हा गेल्या 10 वर्षांपासून या विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तर, प्रदीप देहाडे हा देखील दहा वर्षांपासून या संस्थेत काळजीवाहक म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Atul Save : गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी

दरम्यान, हा संतापजनक प्रकार घडला तो राज्यातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सावे म्हणाले, “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या. जर या संस्थाच छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे. त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झाली पाहिजेत ...नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल… कायमचं!” या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संस्थेवरील देखरेख आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आणखी वाचा 

चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget