एक्स्प्लोर

Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश, हत्येचा व्हिडीओ व्हायरल 

Basavaraj Bommai: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून मारेकऱ्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. 

हुबळी: 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा असे आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पोलिसांना दिले आहेत. आपण या संदर्भात हुबळी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांना निर्देश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चंद्रशेखर गुरुजी यांची आज दोन अज्ञात व्यक्तींनी हुबळीतील एका हॉटेलमध्ये हत्या केली असून त्या संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीसांनी या सर्व परिसरात नाकेबंदी केली आहे. हुबळीतील हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. हॉटेलमधील व्हिडीओच्या फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.

 

चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर गुरुजी यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. चंद्रशेखर गुरुजी हे तीन जुलैपासून हुबळीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्ताने ते हुबळी येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने तपासाचे निर्देश देत काही सूचना केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
Shevgaon Crime : शेवगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या 'अजब' सल्ल्यामुळे नागरिक त्रस्त; एबीपी माझाचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट
शेवगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या 'अजब' सल्ल्यामुळे नागरिक त्रस्त; एबीपी माझाचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट
Thane Crime News: ‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget