Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेच्या खूनाचा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला आहे. समाधान माळी (वय वर्ष 25) असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच हा खळबळजनक प्रकार घडला आहे. आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


पोलीस कोठडीतच संपवलं जीवन


वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत 26 जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (वय 25 वर्ष ) या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आईवडिलांकडे वास्तव्याला होती. याच काळात तिची ओळख समाधानशी झाली. आरतीच्या हत्येमागे लव्ह - ब्रेकअप - मर्डर असे वळण असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. मात्र खुनानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासांत अटक केली. आरोपी समाधानला न्यायालयाने 4 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.


प्रकरणातील बरेच प्रश्न अद्याप अनुत्तरीत


आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा तपास पुढील यंत्रणा करीत आहे.


पीठ गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू


गळ्यातील ओढणी पिठाच्या चक्कीच्या पट्ट्याला अडकून एक भिषण अपघात झाला आहे. यात एका महिलेचे धडापासून डोकं वेगळे होऊन एका 46 वर्षीय महिलेचा करूण अंत झालाय. या घटनेने गोंदियाच्या नवेगावबांध येथील गावात एकच खळबळ उडाली आहे. नवेगावबांध येथील आझाद चौकात राहत असलेले हर्षल उजवणे यांच्याकडे पीठ गिरणी (आटा चक्की) आहे. या माध्यमातून ते लघु व्यवसाय करतात. या व्यवसायात हर्षलची पत्नी नीतू ही हातभार लावत असे. आपल्या कुटुंबाला हातभार लावत ती हा लघु व्यवसाय करत होती. रोजच्या प्रमाणे ग्राहक दळण घेऊन उजवणे आटाचक्कीत येत असत.


ग्राहक दळण घेवून आले असताना नितूने पीठ गिरणी सुरू केली. गिरणीत दळण टाकताना नितुचा दुपट्टा गिरणी मशिनच्या पट्ट्यात अडकला आणि क्षणात नितूही त्या पट्ट्यात ओढली गेली. नितू पट्ट्यासोबत चाकात अडकली. त्यातच तिच दुर्दैवी मृत्यू झालाय. घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या