मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पवई (Powai) परिसरात नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल 4 कोटी 70 लाखांची कॅश पकडली (Cash Seized) आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. पवई पोलिसांनी आयकर विभाग (Income Tax) आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी (Election Officer) त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला.
निवडणुकीत पुन्हा रोकड सापडली
पवई पोलिसांचा नाकाबंदी दरम्यान कॅश व्हॅनमधून 4 कोटी 70 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केली आहे. परवा रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता, पवई पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅनमधून जप्त केले आहेत.
मुंबईत व्हॅनमधून 4 कोटी 70 लाख पकडले
पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.
रोकड भरलेल्या व्हॅन जप्त, या ठिकाणी आतापर्यंत कारवाई
एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. पवई पोलिसांनी आता रोकड जप्त केली आहे. दरम्यान, रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या, सायन, घाटकोपर आणि भांडुप या भागातही पैशाने भरलेली व्हॅन जप्त करण्यात आली होती.
पोलिसांनी सायनमध्ये 1 कोटी 87 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली होती. भांडुपमध्ये 3 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत पोलिसांनी कारवाई केली होती. याशिवाय, घाटकोपरमध्ये 72 लाखांची रोख रक्कम सापडली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :