एक्स्प्लोर

अंबरनाथमधील गोळीबार प्रकरणी 32 आरोपींवर मोक्कांतर्गत गुन्हा, पंढरीनाथ फडकेंच्या पोलिस कोठडीत वाढ 

Ambernath firing Case : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.

Ambernath firing Case  : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 32 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ फडके आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना मोठा झटका बसला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव असून पोलिस संपूर्णपणे एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मला राजकीय वादातून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप फिर्यादी राहुल पाटील यांनी केल्यामुळे कुणाल पाटील आणि त्यांच्या दोन भावांचाही समावेश आरोपींमध्ये करण्यात आला होता. मात्र त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. तर दुसरीकडे पंढरीनाथ फडके यांच्यासह 10 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. 

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी पंढरीनाथ फडके आणि अन्य दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी संपल्यानंतर आज या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने फडके यांच्यासह अन्य दोघांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी फडके यांच्यावतीने अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. सत्यन पिल्ले आणि अॅड. उमेश केदार यांनी युक्तिवाद करत पंढरीनाथ फडके हे तपासात संपूर्ण सहकार्य करत असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका आणि गाड्या जप्त करण्यात आल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. तर पोलिसांनी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने या तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

सरकारी वकील आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी न्यायालयात या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास पोलिस आयुक्तांनी मान्यता दिल्याचे आदेश न्यायालयाला सादर केले. त्यामुळे फडके गटाला मोठा झटका बसलाय. मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह सर्व 32 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना आधी 14 दिवस पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीची कारवाई प्रस्तावित आहे. 

दरम्यान, या प्रकरणात पोलिस सुरुवातीपासून एकतर्फी तपास करत असून पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप अॅड. मानसी म्हात्रे यांनी केला आहे. तर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत इतर आरोपांवर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय तपास हा कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget