Buldhana Crime News : लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्याप्रकरणी दोन गटात तूफान राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे. या वादात एका गटाने लग्नाच्या मिरवणुकीतील चक्क डी.जेची (DJ) गाडी फोडली असून यात या गाडी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी या गावात घडली.


किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या वादाला अचानक हिंसक वळण लागले, परिणामी दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचीही माहिती हाती आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Buldhana Police) तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रण आणली आहे. आतापर्यंत या प्रकरणी 6 संशयितांना अटक करण्यात आली असून इतर 50 ते 60 जण अद्याप फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


किरकोळ वादाला हिंसक वळण 


या प्रकरणाची आधिक माहिती देताना सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी या गावात काल, 27 एप्रिलच्या 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास एक लग्नाची वरात जात होती. दरम्यान, यात काही डी.जे वर सुरू असलेल्या गाण्यावरुन दोन गटात किरकोळ वाद निर्माण झाला. सुरवातीला सुरू असलेल्या या शाब्दिक वादाने अचानक हिंसक वळण घेतेले. त्यानंतर दोन्ही गटात दगड आणि विटांचा वर्षाव सुरू झाला. यात 3-4 लोक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जळगाव-जामोद पोलीस, खामगाव पोलीस, सोनाळा पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रण आणली आहे. या प्रकरणाचा पुढील सध्या पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 


क्षुल्लक कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्याने हाणामारी 


अशीच एक घटना बुलढाण्याच्या रायपूर पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सातगाव भुसारी येथे रात्रीच्या सुमारास घडली. ज्यात क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटात झालेल्या वादात दोन्ही गटाने एकमेकांना लाठ्या-काठ्याने मारहाण केलीय. प्राथमिक माहिती नुसार यात 2 तरुण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.  या घटनेची माहिती रायपुरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुलढाणा, चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील 18 संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


18 संशयितांना अटक 


चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी या गावातील दोन गटात मागील काही दिवसापासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री दोन्ही गट आमोरासमोर आले आणि एकमेकांना जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेची माहिती रायपूर पोलिसाना मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या घटनेतील आतापर्यंत 18 संशयितांना अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या