Buldhana News बुलढाणाकाही दिवसांपासून दारू सोडवण्यासाठी गेलेल्या भक्ताला एका महाराजाने जबर मारहान केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी याच महाराजांनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या वायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास घेतला असता, हा महाराज बुलढाणा (Buldhana Newsयेथील असल्याची माहिती पुढे आलीय. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.


व्हिडिओत मारहाण झालेली व्यक्ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील राजेश श्रीराम राठोड ही होती. मारहाण झालेल्या राजेश राठोड यांनी रायपूर पोलीस स्टेशनला येऊन कथित महाराज विरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घाटनांद्रा शिवारात असलेल्या शिवगिरी संस्थानमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


अल्पवयीन मुलीला अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावाखाली मारहाण


शिवगिरी महाराजांचा एका भक्ताला मारहाण करतानाचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी समाज माध्यमातून संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता याच शिवगिरी महाराजांचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती जरी नसली तरी, मात्र समाज माध्यमात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होत आहे. एका अल्पवयीन मुलीला अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावाखाली हे महाराज मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. या प्रकारामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.


या प्रकारानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घाटनांद्रा शिवारात असलेल्या शिवगिरी संस्थानमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तपासात अधिक काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


पीठ गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू


गळ्यातील ओढणी पिठाच्या चक्कीच्या पट्ट्याला अडकून एक भिषण अपघात झाला आहे. यात एका महिलेचे धडापासून डोकं वेगळे होऊन एका 46 वर्षीय महिलेचा करूण अंत झालाय. या घटनेने गोंदियाच्या नवेगावबांध येथील गावात एकच खळबळ उडाली आहे. नवेगावबांध येथील आझाद चौकात राहत असलेले हर्षल उजवणे यांच्याकडे पीठ गिरणी (आटा चक्की) आहे. या माध्यमातून ते लघु व्यवसाय करतात. या व्यवसायात हर्षलची पत्नी नीतू ही हातभार लावत असे. आपल्या कुटुंबाला हातभार लावत ती हा लघु व्यवसाय करत होती. रोजच्या प्रमाणे ग्राहक दळण घेऊन उजवणे आटाचक्कीत येत असत.
ग्राहक दळण घेवून आले असताना नितूने पीठ गिरणी सुरू केली. गिरणीत दळण टाकताना नितुचा दुपट्टा गिरणी मशिनच्या पट्ट्यात अडकला आणि क्षणात नितूही त्या पट्ट्यात ओढली गेली. नितू पट्ट्यासोबत चाकात अडकली. त्यातच तिच दुर्दैवी मृत्यू झालाय. घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या