Buldhana : सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हापरिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. खुशाल उगले या 56 वर्षीय शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. खुशालराव शेषराव उगले असं आरोपी शिक्षकाच नाव आहे.


शिक्षकाविरोधात किनगावराजा पोलिसांत पोस्को व अॅट्रॉसिटीसह विविध कल्मान्वये गुन्हे दाखल


नुकतेच बदलापूरची आणि अकोल्यातील घटना ताजी असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना पुढे आली  आहे. जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात घडलेल्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या नराधम शिक्षकाविरोधात किनगावराजा पोलिसांत पोस्को व अॅट्रॉसिटीसह विविध कल्मान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसाचं एक पथक रवाना करण्यात आले आहे. आता शाळेतील चिमुकल्यासुद्धा सुरक्षित नसल्याच स्पष्ट झाल आहे.


भिवंडीत खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके दिल्याच्या धक्कादायक प्रकार 


बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर भिवंडीत खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके दिल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आलाय. खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके देऊन छळाचा प्रकार उघडकीस आलाय.  शोभा आश्रम असे खाजगी बालिका आश्रमचे नाव आहे. पीडीतेच्या आजीच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे यास अटक


शिवाय आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे यास अटक करण्यात आली आहे. ही घटना 23 मे ते 15 जुलै 2024 दरम्यान धामणकर नाका परिसरात घडली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1) , बालन्याय (मुलांच्या काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संदर्भात अधिक तपास भोईवाडा पोलीस करीत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई संदर्भात दिल्या महत्वाच्या सूचना