बीड : बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात सरकारी कर्मचारी अडकला आहे. केजच्या तहसीलदारासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून तहसिलदार अभिजीत पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो. बीडमध्ये लाचखोरांच्या विरोधामध्ये लाचलुचपत विभागाकडून मोहीम (Beed ACB Action) राबवण्यात येत असून यामध्ये त्यांना मोठं यश मिळालं आहे.


लाच घेताना कोतवालाला रंगेहाथ अटक


बीडमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानंतर पाटबंधारे विभागातील इंजिनीयरला पकडल्यानंतर आणि आता केजमधील तहसीलदारावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित पाटील हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. 


बीडमध्ये लाचखोरीचं सत्र सुरूच


धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री 10 वाजता ही कारवाई केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालूच आहे. अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो.


20 हजार रूपयांची लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात, तहसिलदार फरार


केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार अभिजीत पाटील याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली आणि यावेळी तो लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. परंतू तहसीलदार अभिजीत पाटील हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.


पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यावर कारवाई


बीड जिल्ह्यातील माजलगावच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला 28 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. शुक्रवारी सलगरकरच्या सांगलीमधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचे बिस्किट, दागिने आणि रोख रक्कम असे एकूण 1 कोटी 61 लाख रुपयांचे ऐवज पोलिसांना सापडला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :


28 हजारांची लाच घेताना पकडलं, PWD च्या इंजिनिअरकडे दोन किलो सोन्यासह 1.61 कोटीचं घबाड सापडलं!