एक्स्प्लोर

माणूस की सैतान! भिवंडीत 39 वर्षाच्या नराधमाचे 7 वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे

Crime : भिवंडीमध्ये घृणास्पद घटना घडली आहे. 39 वर्षीय व्यक्तीनं सात वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करुन अश्लील चाळे केल्याचं समोर आले आहे.

Bhiwandi Latest Crime News update : भिवंडीमध्ये एक घृणास्पद घटना घडली आहे. एका 39 वर्षीय विकृत नराधमानं सात वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या विकृत व्यक्तीची कृती समोर आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. 

एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर  39 वर्षीय विकृत नराधमाकडून  घृणास्पद  प्रकार केल्याची  धक्कादायक घटना  समोर आली आहे. हा नराधम पीडित मुलीला बहाण्याने बोलून तिला सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर बसवून तिच्याशी घृणास्पद चाळे करताना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहे.  आशिक अली शाह असे त्या नरधमाचे नाव आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षीय पीडित मुलगी भिवंडी शहरातील  शांतीनगर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीत कुटुंबासह राहते. त्यातच 25 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी परिसरातील एका कटलरी दुकानातून बांगड्या खरेदी करण्यासाठी घरातून निघाली होती. त्याच सुमारास नराधम  तिला इमारतीच्या खाली भेटला. त्यावेळी पीडितेला त्याने विचारले असता, मी बांगड्या आण्यासाठी जात आहे. हे ऐकताच त्याने पीडित मुलीला बांगड्या घेण्यासाठी पैसे देतो म्हणून  सांगताच, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर  या नराधमाने पीडित मुलीला सांगितले की, तुझे वडील माझे मित्र असून तुला त्यांच्याकडं सोडतो. असे सांगून तिचे अपहरण केलं.

त्यानंतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीवर तिला बसवले.  त्यानंतर तिच्या मागे दुचाकीवर  बसून घृणास्पद चाळे करत असतानाच, या प्रकारामुळे पीडित मुलगी भयभीत होऊन तिने घटनास्थळावरून पळ काढत घर गाठले. आणि तिच्यावर घडलेला घृणास्पद प्रसंग आईला सांगितला. त्याच दरम्यान घडलेला प्रकार पीडित मुलीच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी घर गाठले. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठून  घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलिसांनी नराधम विरोधात भादंवि कलम 366 (ए ) 354, 355 (बी) आणि पोक्सो कायदा कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. 

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून शांतीनगर पोलिसांनी दोन पथके तयार करत सोसायटीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावेळी एका सीसीव्हीटी फुटेजमध्ये नराधम पीडित मुलीशी घृणास्पद कृत्य करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या नाराधमाचा शोध घेऊन त्याला भिवंडीतून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget