ठाणे : भिवंडीत एका सेक्स वर्कर महिलेची डोक्यात पाटा वरवंटा घालून निर्घुण हत्या (Bhiwandi Sex Worker Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्याकडे शय्यासोबत करण्यास आलेल्या व्यक्तीने ही हत्या केल्याचं समोर आलं असून त्या व्यक्तीला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. माही असे या मृत सेक्स वर्कर मुलीचे नाव आहे.
भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेच्या डोक्यात पाटा वरवंटा घालण्यात आला. मागील सहा सात महिन्यांपासून ही महिला या ठिकाणी राहत आहे.
मंगळवारी रात्री या महिलेकडे शय्यासोबत करण्यासाठी आलेल्या इसमाने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोघेजण या परिसरातील दोन महिलांकडे संपूर्ण रात्रभरासाठी शय्यासोबत करण्यासाठी आले होते. या दोघांनी त्या महिलेच्या डोक्यात पाटा वरवंटा घालून हत्या केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील महिलांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी हत्या करून पळून गेलेल्या व्यक्तीच्या दुसऱ्या मित्रास पकडून ठेवले. त्यानंतर स्थानिक भिवंडी शहर ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांच्या ताब्यात त्या व्यक्तीस दिले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.
पत्नीसोबत फोनवर बोलला म्हणून केली हत्या
पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून भिवंडीत एका व्यक्तीने त्याच्या मित्राची हत्या (Bhiwandi Murder) केली. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असलेल्या त्याच्या पत्नीलाही मारायला निघाला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर, वय 40 वर्षे, रा. कामतघर असं आरोपीचं नाव असून भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली.
भिवंडीत अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता. त्याबाबत नारपोली पोलीस ठाणे येथे अज्ञाताच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मयत इसमाची ओळख पटली. सद्दाम इसहाक हुसेन कुरेशी, वय 19 वर्षे, रा. कामतघर, असे मयत तरुणाचे नाव आहे.
ही बातमी वाचा: