Bhiwandi Crime News: एका डॉक्टरवर भर रस्त्यात हल्लेखोराकडून लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी (Bhiwandi Crime News)  शहरातील वंजारपट्टी भागातील मुख्य रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोरावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. अताउल्लाह सकरुल्लाह  अन्सारी (वय 55) असे अटक हल्लेखोराचे नाव आहे. तर कपिल अहमद झाहीरुऊद्दीन फारुखी ( वय, 67) असे गंभीर जखमी असलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी डॉक्टर कपिल अहमद हे भिवंडीतील (Bhiwandi Crime News) मेट्रो भागातील ताज मंजिलमध्ये राहत असून त्यांचा दवाखाना भिवंडीतील (Bhiwandi Crime News) पांजरापोळ परिसरात आहे. तर हल्लेखोर अताउल्लाह हा मूळचा उत्तरप्रदेश मधील भट्टी देवरियाचा रहिवाशी असून तो पांजरापोळ भागातील एका यंत्रमाग कारखान्यात लुम कामगार म्हणून काम करतो. त्यातच 27 मार्च रोजी सकाळच्या सुमारास डॉक्टर कपिल अहमद हे भिवंडीतील (Bhiwandi Crime News) वंजारपट्टी परिसरात असलेल्या बहार ए मदिना मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गेले होते.


Bhiwandi Crime News: नागरीकांनी हल्लेखोराला पकडून चोपले


डॉक्टर कपिल अहमद त्यानंतर नमाज पठण करून वंजारपट्टी भागातील मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास पार्क केलेल्या आपल्या कारकडे पायी जात असतानाच,  हल्लेखोर अताउल्लाह याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हातोडीने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर झाल्याचे पाहून काही नागरीकांनी हल्लेखोराला पकडून चोपले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. तर डॉक्टर कपिल अहमद यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


Bhiwandi Crime News: हल्ल्याचे कारण अद्यापही गुलदस्तात 


दरम्यान, डॉक्टर कपिल अहमद यांच्या तक्रारीवरून हल्लेखोर अताउल्लाहवर भादंवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. डी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, अटक हल्लेखोराला (आज) 28 मार्च रोजी दुपारनंतर भिवंडी न्यायालयात हजर केले जाणार असून हल्ल्याचे कारण अद्यापही समोर आले नसल्याने तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी:


Pune H3N2 Death : धोका वाढला! पुण्यात H3N2 विषाणूचा दुसरा बळी; 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन