Pune H3N2 Death : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (PCMC) शहरामध्ये H3N2 विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला  H3N2 विषाणूची लागण झाली होती. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे H3N2 विषाणूच्या मृतांची संख्या दोनवर गेली आहे. शहरात आत्तापर्यंत H3N2 च्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 15 रुग्णांनी यावर मात केली आहे.


शहरात सध्या कोरोना आणि सोबतच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात कोरोनाचे राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सोबतच H3N2 विषाणूचेही रुग्ण राज्यात वाढत आहे. त्यात पुण्यात आता दुसरा बळी गेल्याने पुण्यात धोका निर्माण झाला आहे. 


शहरात 16 मार्चला H3N2 विषाणूचा पहिला बळी गेला होता. 73 वर्षीय रुग्णाला H3N2 विषाणूी लागण झाली होती.  8 मार्चला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना H3N2 ची लक्षणे आढळली होती. म्हणून त्याच दिवशी त्यांचे नमुने पाठविण्यात आले. 10 मार्चला त्यांना H3N2 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हृदयाशी निगडित त्यांना अधिकचा (Pimpri chinchwad) त्रास होत असल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं.  त्यानंतर चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते. 


तज्ज्ञांचं मत काय?


'H3N2 आणि COVID-19 हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत.  ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह प्रत्येक विषाणूची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत होऊ शकतो. जसे की न्यूमोनिया किंवा तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (ARDS). हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सह-संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही विषाणूंविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय करणे, जसे की कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा साठी लसीकरण हेच होय, असे नवी मुंबईतील अपोल हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्त्र आणि सल्लागार डॉ लक्ष्मण जेसानी यांनी सांगितले.