एक्स्प्लोर

भंडाऱ्यातील पीडितेवर अमानुष अत्याचार, वैद्यकीय चाचणीतून भीषण सत्य समोर; पोलिसांची असंवेदनशीलता?

Bhandara Rape Case : भंडारा सामुहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची असंवेदनशीलता? प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती समोर.

Bhandara Rape Case : भंडाऱ्यातील (Bhandara) सामुहिक बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेवर दुसऱ्यांदा झालेला बलात्कार हा पोलिसांच्या बेफिकीरीनं झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झाला. दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील महिलेनं विचारपूस केली. या पोलीस पाटील महिलेनं तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथे तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली. त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली. 

बहिणीसोबत झालेल्या शुल्लक वादातून रागाच्या भारात घरून निघून गेलेल्या 35 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना. एकदा नाही, दोनदा नाही, तर वारंवार तिच्या अब्रूची लक्तरं काढली. भंडारा जिल्याच्या कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावात 2 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरारच आहे. पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळेच महिलेवर पुन्हा अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. तसेच, पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली असतानाच पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जर ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर तिच्यावर तिथून पळून जाण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. 

काय घडलं त्या दोन दिवसांत? 

पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्यानं ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर  गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. 

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती. 

पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.  

नागपूरचे प्रभारी आयजी संदीप पाटील यांनी या संदर्भात लाखनी पोलीस ठाण्यात येत चौकशी केली. मात्र अद्यापही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही झाली. तर पीडिता ही गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील राहणार असल्यानं आणि पहिल्यांदा झालेला अत्याचार हा गोरेगाव पोलिसांच्या हद्दीत झाल्यानं हा तपास आता गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गोरेगावातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तर लाखनी पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणा संदर्भात भांडाऱ्याचे पोलीस अधिक्षक लोहित मसानी यांना विचारणा केली आहे. पीडिता ही पोलीस ठाण्यात आली होती, त्यावेळी तिचे कपडे देखील व्यवस्थित होते. मात्र तिला विचारपूस केल्यावर ती काहीही सांगत नव्हती, त्यामुळे तिला पोलीस ठाण्यात आसलेल्या महिला सुरक्षा कक्षात महिला पोलिशस शिपयांसोबत बसवून ठेवलं. मात्र पहाटेच्या सुमार महिला पोलीस ठाण्यातून पळून गेली, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget