एक्स्प्लोर

Bhandara Crime News: घरगुती वाद बेतला जीवावर, मद्यधुंद मुलाने जन्मदात्या दिव्यांग वडिलांचा काढला काटा, भंडारा हादरलं!

Bhandara Crime News: भंडारा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका मद्यपी मुलानं आपल्याच दिव्यांग वडिलांचा काटा काढला आहे.

Bhandara Crime News: भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका मद्यपी मुलानं आपल्याच दिव्यांग वडिलांवर फावड्यानं सपासप वार करत बापाचा काटा काढला आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खरबी येथे घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तुकडु बावणे (वय 65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Bhandara Crime News: नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरबी येथील रहिवासी असलेले 65 वर्षीय तुकडु बावणे हे दिव्यांग होते. त्यांचा 27 वर्षीय मुलगा गणेश उर्फ सोनु बावणे याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी आरोपी मुलगा गणेश आणि वडिलांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या गणेशचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेल्या फावड्याने आपल्या दिव्यांग वडिलांवर थेट हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुकडु बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुलानं अत्यंत क्रूरपणे आपल्या दिव्यांग बापाचा काटा काढला.

Bhandara Crime News: नातेवाईक मध्यस्थी करायला गेला अन्...

मुलगा आणि वडिलांमध्ये सुरू असलेला वाद आणि हाणामारी पाहून घरात असलेला 15 वर्षीय नातेवाईक आर्यन बावणे हा मध्यस्थी करण्यासाठी धावला. मात्र, नशेत असलेल्या गणेशने आर्यनवरही फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Bhandara Crime News: आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी (Mohadi Police) तातडीने चक्र फिरवून घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपी मुलगा गणेश उर्फ सोनु बावणे (वय 27) याला अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून आणि दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलानं वडिलांचा जीव घेतल्याने खरबी गावासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली

Pimpri-Pune Liquor Poisoning: 6600 रुपयांच्या फायद्यासाठी अनेकांचा बळी; दारूकांडाचा थरारक हिशोब समोर! योगेश वानखेडेचा धक्कादायक 'डेथ प्लॅन'; कसा झाला खूनी खेळ?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget