भंडारा: धाकट्या बहिणीच्या घटस्फोटाची केस लढत असलेल्या महिला वकिलावर तिच्या बहिणीच्या नवऱ्याने चाकूनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात (Bhandara Crime) घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सरिता माकडे असं हल्ला झालेल्या महिला वकिलाचं नाव आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून महेश डोकरिमारे (42) रा. पांडे महाल असं त्याचं नाव आहे.
सरिता माकडे जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत. सरिता यांच्या बहिणीचे लग्न 2014 मध्ये झालं. मात्र काही काळानंतर त्या दांपत्यामध्ये खटके उडायला सुरवात झाली. हळूहळू दोघांमधील कौटुंबिक वाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचलं. अॅड. सरिता माकडे यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूनं वकीलपत्र घेतलं. त्याचाच राग मनात धरून त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानं त्यांना वाटेत रोखले आणि त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला.
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीने संपवले पतीचे आयुष्य
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीची गळा आवळून हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पतीचा मृतदेह जंगलातील नाल्यात फेकून दिला. ही खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडगी जंगलात उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, या प्रकरणात पतीपासून विभक्त राहणारी पत्नी आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची बाब समोर आली. या थरारक घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रेमसंबंधातून पतीची हत्या
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आदेश राऊत (38) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रियकर विक्की करकाडे (38) आणि पत्नी ज्योती राऊत (35) असे या दोन आरोपीचे नाव आहे.
या घटनेतील मृतपती आदेश राऊत आपल्या पत्नीसह राहत होता. याच गावात प्रियकर विक्की करकाडे हा देखील राहत होता. मृत आदेश राऊत यांची पत्नी ज्योती राऊत आणि प्रियकर विक्की करकाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. कालांतराने ज्योती राऊत या आपल्या पतीपासून विभक्त राहून प्रियकर विक्की करकाडे सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याबाबत पतीला कुणकुण लागेल आणि आपल्या प्रेमसंबंध उघडकीस येईल ही भीती पत्नी आणि प्रियकरला होती.
ही बातमी वाचा: