Gunratna Sadavarte Majha Katta:  मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळणार नाही आणि मिळाले तर ते आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं. कारण मराठा समाज हा मागास ठरत नाही, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य होणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले. मराठा भाऊ मला खूप आवडतात पण ते मागास ठरत नाहीत, ते त्या तत्वात येत नाहीत, म्हणून त्यांना आरक्षण मिळणं शक्य नसल्याचे सदावर्ते म्हणाले. त्यामुळं माझा मराठा आरक्षणाला संविधानिक आणि तात्विक विरोध असल्याचे सदावर्ते म्हणाले. संसदनेनं जरी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला तरी ते आरक्षण दोन दिवस सुद्धा टिकणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले. 


सध्या राज्य सरकारसमोर मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झालाय. आरक्षणासाठी सरकारला रोज नवे अल्टिमेटम दिले जात आहेत. याआधी राज्यात SEBC प्रवर्गातून मराठा ,समाजाला आरक्षण दिलं गेलं, पण ते असंविधानिक असल्याचं म्हणत ज्यांनी न्यायालयामध्ये आरक्षणाविरोधात लढा दिला ते गुणरत्न सदावर्ते यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं कारण सांगितलं.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात राजकारण सुरु 


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या राज्यात राजकारण सुरु असल्याचे सदावर्ते म्हणाले. 70 टक्के राजकीय नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वाटत नाही. केवळ या मुद्यावरुन राजकारण करायचे असल्याचे सदावर्ते म्हणाले. संविधानाच्या मार्गाने विचार केला तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. कारण मराठा समाज मागास ठरत नाही. जर मराठा आरक्षणाच्या संदर्भात संसदेत कायदा केला तरी ते आरक्षण टिकाणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले. दरम्यान, समजा जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर आपण याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला येणार; आजच घेणार भेट