Sam Bahadur Box Office Collection Day 15: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर'(Sam Bahadur) हा  1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सॅम बहादुर या चित्रपटाची आणि रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. गेल्या काही दिवसांपासून सॅम बहादुर चित्रपटाचे कलेक्शन 2 ते 2.5 कोटींपर्यंत मर्यादित होते, पण  या वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शननं 3 कोटींचा आकडा पार केला आहे. जाणून घेऊयात विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाचे 15 व्या दिवसाचे कलेक्शन...

Sacnil च्या रिपोर्टनुसार, 'सॅम बहादुर' या चित्रपटाने रिलीजच्या 15 व्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.  वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत वाढ होणार आहे, असं म्हटलं जात आहे.   देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 66.85  कोटींवर पोहोचले आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे 15 दिवसाचे कलेक्शन...

'सॅम बहादुर'चे 15 दिवसांचे कलेक्शन-

Day 1  6.25 कोटी
Day 2  9 कोटी
Day 3 10.3 कोटी
Day 4  3.5 कोटी
Day 5  3.5 कोटी 
Day 6 3.25 कोटी
Day 73 कोटी
Day 8 3.5 कोटी
Day 9  6.75 कोटी
Day 107.5 कोटी
Day 11 2.15 कोटी
Day 122.45 कोटी
Day 13 2 कोटी
Day 141.65 कोटी
Day 152.25 कोटी
  
एकूण कलेक्शन 66.85  कोटी

'सॅम बहादुर' चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन (Sam Bahadur Worldwide Box Office Collection)

'सॅम बहादुर' या चित्रपटाने देशात  जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील चांगले कलेक्शन केले आहे. Sacnil च्या रिपोर्टनुसार, 'सॅम बहादुर' या चित्रपटाने रिलीजच्या 14 दिवसांत जगभरात जवळपास 90 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एन्ट्री करेल, असंही म्हटलं जात आहे.

‘सॅम बहादुर’ चित्रपटाची स्टार कास्ट (Sam Bahadur Star Cast )

‘सॅम बहादुर’ हा चित्रपट देशातील पहिला फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने  सॅम माणेकशॉ  यांची भूमिका साकारली असून या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  

Sam Bahadur Review : अवश्य पाहावा असा विकी कौशलने मूर्तीमंत उभा केलेला 'सॅम बहादुर'