Bhandara Crime : गावातील एका मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून 40 जणांच्या जमावानं एका इसमाला मारहाण करून गावातील समाज मंदिरात डांबून ठेवले. त्यानंतर सदर इसमाला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवून पोलिसांचे पथक रवाना होत असताना ग्रामस्थांनी पोलिसांचे (Police) वाहनही अडविले. ही धक्कादायक घटना भंडारा (Bhandara Crime News) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचखेडा गावात सोमवारी 17 फेब्रुवारीच्या रात्री घडली. मारोती चंदनबावणे असे ग्रामस्थांनी जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 महिलांसह 40 ग्रामस्थांच्या विरोधात जादूटोणा कायदा अन्वये गुन्हा दाखल करीत 11 जणांना अटक केली आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री मारोती चंदनबावणे हे कुटुंबियांसोबत घरी असताना 40 व्यक्ती लाठ्याकाठ्या घेवून दुचाकीने त्यांच्या घरी पोहोचल्या. या लोकांनी घरात घुसून मारोतीला बळजबरीने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर दुचाकीवर बसवून मारोतीला चिचखेडा पुनर्वसन या गावात आणून समाज मंदिरात डांबून ठेवले.


40 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पवनी पोलिसांचं एक पथक गावात जाऊन मारोतीला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर त्याला पोलीस वाहनातून पवनीला आणत असताना ग्रामस्थांनी पोलिसांचे वाहन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी 8 महिला आणि 32 पुरुषांच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम तसेच 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. तर आतापर्यंत पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. 



आणखी वाचा 


Pune Police: दारुड्यांना हटकलं म्हणून पोलिसालाच डांबून मारलं; पोलिसांनी दिला मिटवण्याचा सल्ला, आता न्याय कुठं मागायचा?


Pune Crime News: त्याच्याशी बोलू नको! नवऱ्याच्या तंबीनंतर पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड संंतापला, सपासप वार करुन अजयला संपवण्याचा प्रयत्न पण..., चाकण हादरलं