Bengaluru Rapido Bike Taxi Driver: बेंगळुरूमध्ये रॅपिडो चालकाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रॅपिडो चालकाने राइड दरम्यानच महिलेसमोर हस्तमैथुन केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर ती महिला खाली उतरल्यानंतरही त्याने महिलेचा पाठलाग केला आणि आता वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल आणि मेसेज करतोय असा आरोपही त्या महिलेने केला आहे. बंगळुरु पोलिसांनी शनिवारी (22 जुलै) आरोपी चालकाला अटक केली.


संबंधित महिलेने ट्विटरवर तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. रॅपिडो बाईक टॅक्सी (Bengaluru Rapido Bike Taxi Driver ) वापरल्यानंतर तिचा लैंगिक छळ कसा झाला हे तिने यामध्ये सांगितले. शुक्रवारी (21 जुलै) तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचे महिलेने सांगितले.


Manipur violence : मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी गेली होती


एका ट्विटच्या (Bengaluru Woman Tweet On Rapido) माध्यमातून या घटनेची माहिती देताना महिलेने सांगितले की, ती मणिपूर हिंसाचारातील पीडितांच्या समर्थनार्थ बंगळुरुमधील टाऊन हॉलमध्ये झालेल्या निदर्शनात सहभागी होण्यासाठी गेली होती. या निदर्शनानंतर तिने परत जाण्यासाठी रॅपिडो बाईक टॅक्सी बुक केली. जेव्हा ड्रायव्हर आला त्यावेळी तो बुक केलेल्या गाडीचा ड्रायव्हर नव्हताच, तर दुसराच ड्रायव्हर पिकअपसाठी आला.  


त्या महिलेने पुढे सांगितलं की, प्रवासादरम्यान आम्ही एका निर्जन भागात पोहोचलो, जिथे दुसरे कोणतेही वाहन नव्हते. धक्कादायक म्हणजे दुचाकी चालवताना चालकाने एका हाताने दुचाकी चालवण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेदरम्यान सुरक्षिततेच्या भीतीने आपण गप्प राहिल्याचं त्या महिलेने सांगितलं.


 






पर्सनल नंबरवर मेसेज सुरू झाला


महिलेने ड्रायव्हरला तिला घराच्या 200 मीटर आधी सोडण्यास सांगितले, जेणेकरून त्याला ठिकाण कळू नये. परंतु यामुळे महिलेचा त्रास कमी झाला नाही. राइड संपल्यानंतर तिला त्या ड्रायव्हरचे कॉल्स आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज येऊ लागले. त्यानंतर महिलेने त्याचा नंबर ब्लॉक केला. त्याने ड्रायव्हरच्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.


रॅपिडोला टॅग करत महिलेने विचारले की, ड्रायव्हरच्या बॅकग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी काय केले जाते? तुमची खात्री आहे की तुमच्या सेवेमध्ये नोंदणीकृत लोक प्रवास करताना विश्वास ठेवू शकतात? तो ड्रायव्हर अजूनही मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहे. 


महिलेच्या ट्विटची दखल घेत पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 


 




ही बातमी वाचा: