Andhra Pradesh Wife Cuts Husband Genitals: आधी एका पत्नीला घटस्फोट द्यायचा, मग दुसरं लग्न करायचं... त्यानंतरही परत उपरती आली की पहिल्या पत्नीच्या मागे लागायचं किंवा तिसरीकडेच लफडं करायचं असं कृत्य अनेकजण करतात. हे समोर आल्यानंतर काहीजण निभावून नेतात, पण काही जणांना जन्माची अद्दल घडते. पण असं काहीही न करता फक्त पहिल्या पत्नीचा इन्स्टाग्राम रील पाहल्यानंतर पहिली पत्नी त्याला काय शिक्षा देईल असं वाटतं? आंध्र प्रदेशमध्ये अशीच काहीशी घटना घडली असून पहिल्या पत्नीचा इन्स्टाग्राम रील पाहिल्यानंतर दुसरी पत्नी इतकी चिडली की तिने रागाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्टच ब्लेडने कापला. आंध्र मधील एनटीआर जिल्ह्यातील ही घटना असून त्या व्यक्तीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 


टाईम्स ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने एक वृत्त दिलं असून त्यामध्ये सांगितले की, पीडित आनंद बाबू (26) याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु वारंवार भांडण झाल्याने तो पत्नीपासून विभक्त झाला होता. चार वर्षांपूर्वी त्याने वरम्मा नावाच्या महिलेशी लग्न केले होते. तेव्हापासून दोघेही एनटीआर जिल्ह्यातील माप्ला गावात राहतात आणि रोजंदारी मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात.


व्हिडीओ पाहताना पत्नीने पाहिले


शनिवारी (22 जुलै) सकाळी वरम्मा हिला त्याचा पती आनंद बाबू मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे लक्षात आले. तिने जवळ जाऊन पाहिले असता तो पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्राम रील्स पाहत असल्याचं तिला दिसलं.  हे पाहून वरम्माचा राग अनावर झाला आणि यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद नंतर हाणामारीपर्यंत गेला. मग संतापलेल्या पत्नीने पतीवर ब्लेडने वार करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.


रुग्णालयात दाखल


प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर त्या पतीने आरडाओरडा केला, ते ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की आनंदच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्याला तात्काळ नंदीगम सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतरच्या उपचारासाठी विजयवाडा येथे नेण्यात आले. आनंदच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यानंतरल त्याच्यावर उपचार केले. सध्या आनंद बाबूची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: