Turmeric Research and Training Center : राज्यासाठी हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. बुधुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक झाली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. 


राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीनं  शिफारशींना तत्वत: मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


दरम्यान, काल रात्री  नऊ वाजता बहुमत चाचणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले फेसबूक लाईव्ह करत आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. उद्यापासून पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे. शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठाकरेंनी हा निर्णय घेतला.


कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव  आणि  नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे  महाविकास आघाडी सरकार संकटात आले होतं. त्यानंतर अखेर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोर न जाण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.


महत्वाच्या बातम्या: