Shivaji University election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या नोंदणीकृत निर्वाचक गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे.  शिवाजी विद्यापीठाच्या http://www.unishivaji.ac.in/abou.../University-Election-2022 या लिंकवर नोंदणी करता येईल.


ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे. http://www.unishivaji.ac.in/abou.../University-Election-2022 या ठिकाणी सर्व माहिती आणि २० रूपये शुल्क भरून त्याची प्रिंट काढून ती शिवाजी विद्यापीठात १३८ नंबर मध्ये पोहोच करावी लागेल. ऑफलाईन नोंदणी 5 जुलैपर्यंत करता येईल. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले व अपूर्ण अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. 


नोंदणीकृत पदवीधर नोंदणी व नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी एकाच अर्जाद्वारे करण्यात येत आहे. नोंदणीकृत पदवीधर नोंदणीसाठी रूपये २०/- इतके शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरून त्याची पावती अर्जासोबत जोडावी लागेले. नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.


अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 



  • पदवी प्रमाणपत्राची स्वसांक्षाकित प्रत

  • निवासाचा पुरावा (आधार कार्ड, निवडणूक ओळख पत्र, शिधापत्रिका, पारपत्र, विद्युत वापर देयक, वाहन चालन परवाना) यापैकी एक

  • शुल्क भरलेली पावती

  • ज्यांच्या पदवी प्रमाणपत्रावरिल व निवासाच्या पुराव्यावरिल नावामध्ये बदल असेल त्यांनी अर्जासोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र/शासन राजपत्र/पॅन कार्ड यापैकी एका कागदपत्राची प्रत स्वसांक्षाकित करून अर्जासोबत जोडावी. 

  • नोंदणी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर सर्व अजांची छानणी करून पात्र नोंदणीकृत पदवीधर मतदार यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

  • नोंदणीकृत पदवीधर मतदार यादीमध्ये ज्या पदवीधरांचे नाव असेल त्यानांच अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर निर्वाचक गणासाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी मतदान करता येईल.