Belgaon Crime : नवऱ्याकडून होत सातत्याने होत असलेली मारहाण आणि सासू- सासऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून माय लेकाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशीच ही घटना समोर आली आहे. पतीची मारहाण आणि सासू- सासऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून अरगन तलावामध्ये झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी माय लेकराच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना बेगगावमध्ये घडली आहे.
तलावात तरंगलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
कविता बसवंत जुनेबेळगावकर आणि समर्थ बसवंत जुने बेळगावकर (रा. कलखांब) अशी आत्महत्या केलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. मिलिटरी प्रशासनाने याबाबतची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हर्फ आणि फेसबुक फ्रेंड सर्कल या संघटनेच्या माध्यमातून तलावावर तरंगत असलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यावेळी मृतदेह सोबत मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याने आणि सासू-सासर्यांनी त्रास दिल्याने मुलगा आणि आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच हर्फ आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल संघटनेचे बसवराज हिरेमठ, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदींनी प्रयत्न करून पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या दोन-तीन दिवसात आजूबाजूच्या पोलिस स्थानकात बेपत्ता झालेल्या यादीनुसार तपास केला असता कलखांब येथील आई मुलगा बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले होते. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी हलवण्यात आले.सदर घटनेची कॅम्प पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या