Dadarao Keche : देव आला तरी अपक्ष उमेदवारी मागं घेणार नाही म्हणाले, दिल्लीतून बोलावणं आलं, अमित शाहांसोबत चर्चा होताच दादाराव केचेंचा यूटर्न

Dadarao Keche : बंड करणाऱ्या भाजप आमदार दादाराव केचे उमेदवारी मागे घेणार आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं भाजपच्या सुमित वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

दादाराव केचे

1/5
वर्ध्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध बंड करणारे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे.
2/5
आमदार दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रातून दोनदा विजयी झाले. पण या निवडणुकीत त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने ते नाराज होते.
3/5
दादाराव केचे यांनी बंड करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दादाराव केचे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं.
4/5
दादाराव केचे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली. पण देव आला तरी आपण अपक्ष उमेदवारी मागे घेणार नसल्याची भूमिका दादाराव केचे यांनी मांडली होती.
5/5
अखेर दादाराव केचे यांना दिल्लीवरून बोलावणे आले आणि त्यांनी अमित शाहा यांच्याशी चर्चा केल्यावर ही उमेदवारी मागे घेणार असल्याची घोषणा आता केली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना भाजपनं नेमकं कोणतं आश्वासन दिलं असावं याचीच चर्चा होत आहे. आर्वी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मयुरा काळे निवडणूक लढवत आहेत.
Sponsored Links by Taboola