Devendra Fadnavis, पुणे : राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु असतानाच अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची डोघेदुखी वाढली आहे. दरम्यान, बंडखोर नेत्यांचा महायुती आणि खासकरुन भाजपला फटका बसू नये, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे भाजप नेते संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नाराज सनी निम्हण यांची घेतली भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज सनी निम्हण यांची भेट घेतली आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विनायक निम्हण यांचे सूपुत्र सनी निम्हण लढण्यासाठी इच्छुक होते. भाजपकडून त्यांनी मागणी उमेदवारीची केली होती. सनी निम्हण यांनी काँग्रेस पक्षाच्या देखील उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी निम्हण यांच्या निवासस्थानी जात सनी निम्हण यांची नाराजी दूर केल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नाराज संजय काकडे यांची समजूत काढली
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या संजय काकडे यांच्या घरी देखील देवेंद्र फडणवीस गेले होते. संजय काकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या अनेक दिवसापासून संजय काकडे भाजपमध्ये नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जात संजय काकडे यांची समजूत काढली आहे. आता दोन्ही नेते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीस संजय काकडे यांच्या घरी
संजय काकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी होते इच्छुक
संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत जाणार असल्याच्या होत्या चर्चा
गेल्या अनेक दिवसापासून संजय काकडे भाजपमध्ये नाराज आहेत
त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जात संजय काकडे यांची समजूत काढली आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नाराज सनी निम्हण यांची भेट
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विनायक निम्हण यांची सुपुत्र सनी निम्हण लढण्यासाठी होते इच्छुक
भाजपकडून त्यांनी उमेदवारीची केली होती मागणी
सनी निम्हण यांनी काँग्रेस पक्षाच्या देखील उमेदवारीसाठी दिल्या होत्या मुलाखती
देवेंद्र फडणवीस यांनी निम्हण यांच्या निवासस्थानी जात सनी निम्हण यांची नाराजी केली दूर
इतर महत्त्वाच्या बातम्या