Beed : काही दिवसांपूर्वी आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू झाला होता. केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत आता पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. आवादा कंपनीच्या त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू साप चावल्याने झाल्याचे बीड एसपी नवनीत कावंत यांनी सांगितले आहे. कामगाराच्या मृत्यूबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अधिकची माहिती अशी की, मूळचा पंजाबचा असलेला गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला होता. त्याचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला होते. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला असल्याचे समोर आले होते. सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती आता समोर आली असून साप चावल्याने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या