Moon Transit 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे, विविध ग्रहांचे संक्रमण, अनेक राशी परिवर्तन अनेकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे संक्रमण 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी, चंद्र ग्रह सर्वात वेगवान वेगाने त्यांच्या राशी बदलण्यासाठी ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. यापैकी 3 अशा राशी आहेत, ज्यांना चंद्र संक्रमणामुळे फायदा होणार आहे. जाणून घ्या..
चंद्राच्या संक्रमणाचा प्रभाव 12 राशींवर शुभ-अशुभ प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवस राहतो. सध्या चंद्र सिंह राशीत विराजमान आहे. शनिवार, 18 जानेवारी रोजी रात्री 9:28 वाजता चंद्र बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र, मनासाठी जबाबदार ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकू शकते?
कर्क - आव्हानांचा सामना करावा लागेल
कर्क राशीसाठी चंद्राचे भ्रमण फलदायी ठरेल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. व्यवसायात सुरू असलेले नुकसान दूर होईल आणि यश मिळविण्यासाठी तुम्ही नवीन सुरुवात करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढू शकेल. नातेसंबंध सुधारतील. वादविवादापासून दूर राहाल. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या - प्रलंबित कामे पूर्ण होतील
कन्या राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनात उत्साह राहील. सामाजिक कार्यात रुची वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील त्यामुळे मनही प्रसन्न राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुठेतरी जाण्याचे बेत आखले जातील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मीन - नात्यात गोडवा वाढेल
मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. व्यवसायात प्रगती होऊ शकते. सामाजिक कार्यात रुची वाढेल. व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना आखू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. नात्यात गोडवा वाढेल. परदेशात जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील
हेही वाचा>>>
Garud Puran: विवाहित स्त्रीने पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध का ठेवू नयेत? गरुडपुराणात सांगितलेली 'अशी' भयंकर शिक्षा, अंगावर येईल काटा!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )